म्युकर मयकोसिस(काली,पांढरी बुरशी)
June 12, 2021 | Blog | No Comments
घाबरू नका ,दक्षता घ्या!
म्युक्आरमायकोसिस(काली बुरशी),या कॉविड19 च्या नवीन लाटेत आलेल्या आजाराबद्दल आपणास थोडीफार माहिती झाली असेलच,नुकताच कॉविड मधून बाहेर पडलेल्या रुग्ण आणि नातेवाईकांच्या त्रासात यामुळे खूप भर पडली आहे तसेच आरोग्य यंत्रणेवरचा ताण अचानक वाढला आहे, एक कान, नाक घसा तज्ञा म्हणून याविषयी काही प्राथमिक माहिती. म्युकर नावाची बुरशी ही निसर्गात सर्वत्र पसरलेली आहे,पण दुसऱ्या लाटेत रुग्णांच्या शरीरात( नाक,सायनसेस, डोळे,मेंदू,फुफ्फुसे),, या क्रमाने तिचा झपाट्याने प्रादुर्भाव होत आहे. नाक,सायनसेस,टाळू,डोळा,मेंदू,रक्ताभिसरणातून फुफ्फुसे व बाकी अवयव असा संक्रमणाचा साधारण प्रवास असून योग्य वेळी योग्य ते उपचार न झाल्यास रुग्णाच्या जीवाला धोका उत्पन्न होत आहे किंवा अमूल्य अवयव गमावण्याची वेळ येत आहे,पण या विचाराने घाबरून जाण्यापेक्षा पुरेशी वैद्यकीय माहिती/मार्गदर्शन व दक्षता घेणे कधीही चांगले.
याचा धोका कुणाला जास्त आहे?
✅ नुकतेच कॉविड आजारातून बरे झालेलें विविध वयोगटातील व्यक्ती
✅ विशेषतः अनियंत्रित मधुमेही
✅ दिवसआनपेक्षा जास्त स्टिरॉइड व ऑक्सिजन द्यावे लागले रुग्ण
✅ वृद्धत्व किंवा इतर कारणांमुळे प्रतिकारशक्ती खालवलेले रुग्ण
✅ कॉविड झालेला असताना मनानेच डॉ,च्या सल्ल्याशिवाय उपचार करून घेणारे रुग्ण(स्टिरॉइड्स ई,)
याशिवाय नाक,सायनसेस,डोळा यांच्याशी निगडित काहीही त्रास अचानक ( म्हणजे पूर्वी नसताना) उद्भवला असेल तर,,,अश्यांनी जास्त सतर्क राहणे चांगले,
लक्षणे कोणची,,,एक किंवा दोन्ही नाक बन्द होणे,नाकाचा बाजुला सूज येणे,नाकातू न पु,खपली येणें, नाक कोरडे वाटणे,रक्तस्त्राव, चेहऱ्याची एक बाजू ठनाकाने,तीव्र डोकेधुखी, डोळा दुखणे,लाल होणे,सतत पाणी येणे,ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात,यावर आधारित कान नाक घसा तज्ज्ञ म्युकर मयकोसिस चा अंदाज बांधू शकतात, ज्याची खात्री खलील तपासण्या द्वारे होते,,1,डीप नेसल इंडोस्कोपी2,नेसल स्वब(२ वेला कदाचित3,नेसल बायोप्सी,, सी टी स्कॅन नाक व सायनसेस चा,आवश्यक तेनुसार डोळ्याचा सुद्धा4,एम आर आय ,नाक,सायनसेस व डोळाच्या(केल्यास उत्तम)
वरील आजाराची तपासणी, निदान, प्राथमीक उपचार आणि सल्ला/मार्गदर्शन यांसाठी संपर्क साधावा. धन्यवाद!
डॉ,अश्विन लव्हेकर कान, नाक, घसा तज्ज्ञ. लव्हेकर हॉस्पिटल. वझीराबाद, नांदेड
📞 फो: 2462356667
📱मो: 9579233418
🖥️ ऑनलाईन कन्सलटेशन
तुम्ही आणि तुमचे प्रियजन निरोगी आणि सुरक्षित राहोत ही सदिच्छा!🙏